मराठी राज भाषा गौरव दिन
मराठी राज भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२६ ठाण्यातील श्री मावळी मंडळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे साजरा केला गेला.
हा कार्यक्रम मराठी लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केला जातो.
या वर्षी नभागण साहित्यिकांचे अंतर्गत ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना समर्पित केला. यावेळी इयत्ता ६ वी ते ११वी तील विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी कार्यक्रम सादर केले. यात महाराष्ट्राची महती सांगणारी गीते आणि माहिती सादर करण्यात आली. कवयित्री इंदिरा संत यांचा कविता सादर करण्यात आल्या. बाजीप्रभूंचा पोवाडा, मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे नाटक व तसेच देवीचा गोंधळ, गणपती नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्व मुलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री मावळी मंडळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.रोशन वाघ सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि राजभाषेच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.