
मराठी राजभाषा दिन
एक अभिमानाने बोलुयात मराठी, अभिमानाने जगूयात मराठी, मायबोली गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ! मराठी भाषा अभिमान दिनाच्या शुभेच्छा!
या दिना निमित्ताने श्री मावळी मंडळ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले जसे की गाणी, नाटकं, सणांवर आधारित नाच आणि मराठी भाषा दिन ज्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, त्या वि . वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजां ची माहिती. इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.या प्रसंगी श्री मावळी मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री.सुधाकर मोरे सर व विश्वस्त सदस्य श्री. डोंगरे सर, श्री. मुकणे सर उपस्थित होते. श्री. सुधाकर मोरे सर यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी विदयार्थ्यान चे कौतुक केलं… हा सर्व कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.रोशन वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.